-
कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ‘सानिया’ ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
-
जरी खलनायिकेची भूमिका असली तरी प्रेक्षक तिच्यावर भरभरून प्रेम करत आहेत.
-
जान्हवीने नुकतेच नऊवारी साडीत खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी जान्हवीने पिवळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर जान्हवीने पारंपरिक दागिने परिधान केले आहेत.
-
या फोटोशूटला जान्हवीने ‘छबीदार छबी…’ असं कॅप्शन दिले आहे.
-
जान्हवीच्या या नऊवारी साडीतील लूकवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
जान्हवीने ‘आई माझी काळुबाई’, ‘स्वामी समर्थ’ या मालिकांमध्येही काम केले आहे.
-
तसेच जान्हवी काही मराठी चित्रपटातही झळकली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)

२० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक, अनेकांना ब्लॅकमेल केल्याचा संशय