-
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
अलीकडेच प्राजक्ताचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पुढच्या शूटिंगमधून ब्रेक घेत नुकतीच प्राजक्ता तिच्या कर्जत येथील फार्महाऊसवर विश्रांती घ्यायला पोहोचली आहे.
-
प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी कर्जत येथे ‘प्राजक्तकुंज’ नावाचं आलिशान फार्महाऊस खरेदी केलं होतं.
-
“याचसाठी केला होता अट्टाहास…माझा प्रत्येक चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि नव्या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी मी या ‘प्राजक्तकुंज’वर क्षणभर विश्रांती घ्यायला येते” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
प्राजक्ताच्या फार्महाऊसचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या फोटोमध्ये निसर्गरम्य वातावरणात विश्रांती घेत, प्राजक्ता फरसाणचा आस्वाद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
प्राजक्ताच्या फोटोमध्ये फरसाण पाहून नेटकऱ्यांनी “फरसाणची गोष्ट खरी आहे तर”, “इथेही फरसाण आणलंस”, “फरसाण प्रेमी प्राजक्ता”, “प्राजू नेहमी फरसाण खाते” अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
-
दरम्यान, अभिनेत्रीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
“पैशांनी भरलेली कपाटं, दोन दिवसांपासून मोजणी सुरू”, पंतप्रधान मोदी म्हणाले, “नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहून…”