-
हॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांबरोबरच आता बॉलीवूडमध्ये कोरियन चित्रपटांचे रिमेकही बनवायला सुरुवात झाली आहे. जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबाबात
-
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेला रणबीर कपूरचा ‘बर्फी’ हा कोरियन चित्रपट ‘लव्हर्स कॉन्सर्टो’ (२००२) चा हिंदी रिमेक आहे.
-
२०१९ साली प्रदर्शित झालेला सलमान खानचा चित्रपट ‘भारत’ हा कोरियन चित्रपट ‘ओड टू माय फादर’ (२०१४) चा रिमेक आहे.
-
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यन स्टारर चित्रपट ‘धमाका’ हा कोरियन चित्रपट ‘द टेरर लाइव्ह’ (२०१३) चा हिंदी रिमेक आहे.
-
अनुष्का शेट्टी आणि रणदीप हुड्डा यांचा २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘दो लफ्ज़ों की कहानी’ हा चित्रपट कोरियन चित्रपट ‘ऑलवेज’ (२०११) चा रिमेक आहे.
-
२०१४ मध्ये रिलीज झालेला ‘एक व्हिलन’ हा दक्षिण कोरियाई चित्रपट ‘आय सॉ द डेव्हिल’ (२०१०) चा रिमेक आहे.
-
२०१५ मध्ये रिलीज झालेला ऐश्वर्या राय बच्चन आणि इरफान खान स्टारर चित्रपट ‘जज्बा’ हा कोरियन चित्रपट ‘सेव्हन डेज’ (२००७) चा रिमेक आहे.
-
२०११ मध्ये प्रदर्शित झालेला इमरान हाश्मी स्टारर चित्रपट ‘मर्डर २’ हा कोरियन चित्रपट ‘द चेजर’ (२००८) पासून प्रेरित आहे.
-
२०१५ मध्ये रिलीज झालेला सलमान खानचा ‘प्रेम रतन धन पायो’ हाही कोरियन चित्रपट ‘मास्करेड’ (२०१२) चा रिमेक आहे.
-
सलमान खानचा २०२१ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड’ हा कोरियन चित्रपट ‘आउटलॉज’ (२०१७) चा हिंदी रिमेक आहे.
-
२०१६ मध्ये रिलीज झालेला जॉन अब्राहमचा चित्रपट ‘रॉकी हँडसम’ हा कोरियन चित्रपट ‘द मॅन फ्रॉम नोव्हेअर’ (२०१०) चा रिमेक आहे.
-
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेला अक्षय कुमार स्टारर अॅक्शन कॉमेडी चित्रपट ‘सिंग इज ब्लिंग’ हा कोरियन चित्रपट ‘माय वाईफ इज अ गँगस्टर 3’ (२००६) चा रिमेक आहे.
-
२०१६ मध्ये रिलीज झालेला ‘टीन’ हा दक्षिण कोरियन थ्रिलर चित्रपट ‘मॉन्टेज’ (२०१३) पासून प्रेरित आहे.
-
२००८ मध्ये रिलीज झालेला ‘अगली और पगली’ हा दक्षिण कोरियाच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘माय सॅसी गर्ल’ (२००१) वर आधारित आहे.
-
२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिंदा’ या चित्रपटाची कथा ‘ओल्डबॉय’ (२००३) या कोरियन चित्रपटातून घेण्यात आली आहे.

रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची ग्रँड ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…