-
अभिनेत्री मलायका अरोरा अभिनयापेक्षा तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
मलायकाचा फॅशन सेंसही चर्चेचा विषय असतो.
-
अभिनेत्रीच्या कामाबद्दल जितकं बोललं जात तितकंच तिच्या खासगी आयुष्याच्या बाबतीतही बोललं जातं.
-
मलायका आणि अर्जुन कपूरच्या नात्याविषयी कायम चर्चा रंगली असते. कधी ब्रेकअप तर कधी दोघांच्या लग्नाची.
-
आज मलायका लेक अरहान खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चर्चेत आली आहे.
-
मलायका आणि अरबाज खान आज आपल्या लाडक्या लेकाचा २१वा वाढदिवस साजरा करत आहेत.
-
काल मध्यरात्री १२ वाजल्यापासून मलायका तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लेकाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर करत आहे.
-
तिने अरहानच्या मागे चालतानाचा एक फोटो शेअर करत लिहीलं की, “माझ्या बाळा, तुझी आई कायम तुझ्या पाठिशी आहे… खूप सारं प्रेम”
-
तसेच तिने अरहानचे बालपणीपासूनचे ते आतापर्यंतच्या अनेक फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
-
अरहानचा हा व्हिडीओ शेअर करून मलायकाने लिहीलं आहे, “माझं छोटं बाळ आज २१ वर्षांचं झालं. माझी तुझ्यासाठी एक साधी इच्छा आहे की, तुझे आयुष्य सर्वोत्तम जावो आणि ते तू भरभरून जगाव. हस, हसवत राहा आणि गरज असल्यास रड..जितकी मेहनत करतोस तितकाच खेळ आणि प्रामाणिक राहा.”
-
“ज्या लोकांवर आणि गोष्टींवर प्रेम करतोस त्यांना वेळ दे, त्यांच्यासाठी वेळ काढ. उत्तम झोप आणि चांगली स्वप्न बघ. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेव. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोड मुला. तुझ्यावर आई सर्वात जास्त प्रेम करते. तुझा तिला खूप अभिमान आहे,” अशा खास अंदाजात मलायकाने लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड सेलिब्रिटींसह मलायकाचे चाहते अरहानला २१व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच