-
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे ही जमलेली जोडी आता खऱ्या आयुष्यात पती-पत्नी झाले आहेत.
-
१८ नोव्हेंबरला अमृता-प्रसादचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती.
-
ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत अन् मग सप्तपदी असं समारंभपूर्व लग्न अमृता-प्रसादचं पाहायला मिळालं.
-
गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण १८ नोव्हेंबरला पार पडला.
-
सध्या सोशल मीडियावर अमृता-प्रसादच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे.
-
अमृता-प्रसादच्या लग्नात एका जोडीने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं.
-
ही जोडी म्हणजे अभिषेक देशमुख आणि कृतिका देव यांची जोडी
-
अमृताचा सख्खा भाऊ अभिषेक असून त्याची पत्नी कृतिका देव आहे.
-
दोघांनी अमृता-प्रसादच्या लग्नासाठी खास लूक केला होता.
-
अभिषेकने बहिणीच्या लग्नासाठी खास सी ग्रीन रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
तर कृतिकाने नियॉन ऑरेंज रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचं सौंदर्य खुललं होतं.
-
दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिषेक सध्या ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत यश या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर कृतिका अलीकडेच ‘ताली’ या लोकप्रिय सीरिजमध्ये झळकली होती. तिने तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास