-
प्रसाद जवादे-अमृता देशमुख यांचा शाही विवाहसोहळा १८ सप्टेंबरला मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
प्रसाद-अमृताच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
‘फ्रेशर्स’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे अभिनेत्री अमृता देशमुख घराघरांत लोकप्रिय झाली.
-
त्यामुळे अमृताने या मालिकेतील तिच्या सगळ्या सहकलाकारांना लग्नाचं निमंत्रण दिलं होतं.
-
‘फ्रेशर्स’ मालिकेत धवलची भूमिका साकारणारा आणि सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ओंकार राऊतने अमृताच्या लग्नातील काही Unseen फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
“प्रसाद-अमृता तुम्ही किती गोड दिसता एकत्र!! तुम्हाला खूप प्रेम” असं कॅप्शन ओंकार राऊतने या फोटोंना दिलं आहे.
-
प्रसाद-अमृताच्या लग्नातील काही खास फोटो शेअर करत ओंकारने ‘फ्रेशर्स रियुनियन’ असा हॅशटॅग वापरला आहे.
-
‘फ्रेशर्स’ मालिकेतील मिताली मयेकर सोडून इतर सगळे कलाकार अमृताच्या लग्नाला तिला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
-
ओंकारने शेअर केलेल्या फोटोंमध्ये रश्मी अनपट, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ खिरिद, अपूर्व रांजणकर असे मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत.

Exit Polls 2023 Result: कोण जिंकणार लोकसभेची सेमीफायनल? काय आहेत एग्झिट पोलचे अंदाज?