-
अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा लग्नसोहळा १८ सप्टेंबरला थाटामाटात पार पडला.
-
‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वामुळे दोघांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती.
-
जुलै महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून त्यांचे चाहते अमृता-प्रसादच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.
-
प्रसाद-अमृताने त्यांच्या लग्नातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
दोघांच्या मराठमोळ्या लूकने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
अमृता खास लग्नासाठी भरजरी साडी, हातात मोत्यांची अंगठी, नाकात नथ आणि गळ्यात पारंपरिक दागिने परिधान करून तयारी झाली होती.
-
लग्नसोहळ्यात प्रसादने एक अनोखी परंपरा सुरू करत अमृताच्या नावाचं खास लॉकेट गळ्यात बांधलं. त्याच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
-
प्रसाद-अमृताच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड होत आहेत.

“गद्दारी करून कमी वेळेत अमाप पैसा अन् सत्तेचे बळ मिळालेल्यांना…”, भाजपा आमदाराची श्रीकांत शिंदेंवर टीका