-
झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.
-
‘समसारा'(द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी एकत्र आली असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला.
-
संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या ‘समसारा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे करत आहेत.
-
सागर लढे, विश्वेश वैद्य, समीर मानेकर यांच्या कथेवर समीर मानेकर, सागर लढे यांनी पटकथा रचली आहे.
-
तर समीर मानेकर, निहार भावे यांनी संवादलेखन केलं आहे.
-
विश्वेश वैद्य यांनी संगीत, अक्षय राणे छायांकनाची जबाबदारी निभावत आहेत.
-
सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे.
-
कार्यकारी निर्माता म्हणून महेश भारंबे व अन्वय नायकोडी काम पाहणार आहेत.
-
‘समसारा’ या चित्रपटाची कथा अतिशय अनोखी आहे.
-
गर्भवती भानवीच्या दैवी जुळ्या मुलांना नष्ट करण्याची इच्छा असलेला एक असुर तिच्यासमोर येतो आणि देव, असूर यांच्यात युद्ध सुरू होते.
-
त्यामुळे मृत्यूचा देव यम आणि जीवनाची देवी यमी यांची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
-
अत्यंत वेगळी गोष्ट आणि उत्तम स्टारकास्ट यांचा मिलाफ ‘समसारा’ या चित्रपटात झाला आहे.
-
त्याशिवाय प्रेक्षकांची आवडती सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकत्र येणं हे महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव आणि ऋषी सक्सेना/इन्स्टाग्राम)

भारतासह जगभरात हाहाकार घडवून आणू शकते ‘ही’ भविष्यवाणी; नॉस्ट्रॅडॅमसने २०२४ साठी काय लिहून ठेवलंय?