-
अभिनेता मन्सूर अली खानने अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर त्याच्यावर टीका होत आहे.
-
या आक्षेपार्ह विधानानंतर नादिगर संगम नावाच्या चित्रपट संस्थेने त्यांच्यावर तात्पुरती बंदी घातली.
-
त्यानंतर आज (२१ नोव्हेंबर रोजी) मन्सूर अली खान याने चेन्नईमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. आपण केलेल्या विधानासाठी माफी मागणार नसल्याची भूमिका खानने घेतली आहे. यासंदर्भात इडिया टुडेने वृत्त दिलंय.
-
माझ्याविरुद्ध केलेली कारवाई मागे घेण्यासाठी मी नादिगर संगमला चार तासांचा वेळ देतोय. मी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. पण मी माफी मागणाऱ्या व्यक्तीसारखा दिसतो का? – मन्सूर अली खान
-
मीडिया माझ्या विरोधात वाट्टेल ते लिहू शकते. मी कोण आहे हे लोकांना माहीत आहे. माझ्याकडे तमिळ लोकांचा पाठिंबा आहे. – मन्सूर अली खान
-
माध्यमांनी त्रिशाची प्रतिक्रिया प्रसिद्ध करताना आमच्या दोघांचे फोटो शेजारी लावले, ते फोटो वधू-वरांसारखे दिसतात. – मन्सूर अली खान
-
तुम्हा सर्वांकडे माझा एक चांगला फोटो नव्हता का वापरायला? पण त्यातल्या त्यात काही फोटोंमध्ये मी छान दिसतोय. मन्सूर अली खान
-
चित्रपटातील बलात्काराच्या सीनचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर वास्तविक बलात्कार करणे असा होतो का? – मन्सूर अली खान
-
सिनेमात खून करणे म्हणजे काय? तुम्ही खरंच एखाद्याचा खून करता का? थोडी अक्कल असायला हवी ना? मी काही चुकीचे बोललो नाही. मी माफी मागणार नाही – मन्सूर अली खान
-
दरम्यान, त्रिशाने मन्सूर अली खानच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत आपण पुन्हा कधीच्या त्याच्याबरोबर काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं.
-
“जेव्हा मी त्रिशाबरोबर काम करतोय, असं ऐकलं तेव्हा मला वाटलं की चित्रपटात बेडरूमचा सीन असेल. मला वाटलं मी तिला बेडरूममध्ये घेऊन जाईन. मी माझ्या आधीच्या चित्रपटांत इतर हिरोईनबरोबर असे सीन केले होते. हे माझ्यासाठी नवीन नाही. पण या लोकांनी मला काश्मीर शेड्यूलमध्ये त्रिशाला पाहूही दिले नाही,” असं मन्सूर अली खानने म्हटलं होतं.
-
(सर्व फोटो – त्रिशा व मन्सूर अली खान इन्स्टाग्राम)

“बारामती लोकसभेची जागा लढवणारच,” अजित पवारांचा निर्धार, सुप्रिया सुळे म्हणाल्या…