-
बॉलिवूड अभिनेता व निर्माता अरबाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मध्यंतरी प्रचंड चर्चेत होता. मलायका अरोराबरोबर त्याचा घटस्फोट झाल्यावर अरबाजच्या आयुष्यात प्रसिद्ध मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीची एन्ट्री झाली.
-
प्रसिद्ध मॉडेल आणि लोकप्रिय डान्सर जॉर्जिया एंड्रियानी गेल्या अनेक वर्षांपासून अरबाज खानबरोबर रिलेशनशिपमध्ये होती.
-
अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी यांच्या वयात तब्बल २० वर्षांचा फरक आहे. काही दिवसांपूर्वी दोघंही विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर आता जॉर्जियाने प्रतिक्रिया दिली आहे.
-
जॉर्जिया म्हणाली, “अरबाज आणि मी आता फक्त चांगले मित्र आहोत. यापुढे आम्ही कायम एकमेकांच्या संपर्कात राहू…आधी आमचं नातं मित्र-मैत्रिणीपेक्षा अधिक होतं.”
-
जॉर्जिया मलायका अरोराचा उल्लेख करत म्हणाली, “अरबाज आणि मलायकाच्या नात्याचा आमच्या दोघांच्या नात्यावर कधीच परिणाम झाला नाही. त्यांचं नातं आमच्या आड कधीच आलं नाही. खऱ्या आयुष्यात त्यांचा घटस्फोट फार आधीच झाला होता.”
-
“आज मला अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखलं जातं हे ऐकून खरंच खूप वाईट वाटतं.” असं जॉर्जियाने सांगितलं.
-
अभिनेत्री म्हणाली, “आम्हा दोघांना सुरुवातीपासूनच माहीत होतं आमचं हे नातं आयुष्यभर टिकणार नाही, कारण आम्हा दोघांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व पूर्णपणे वेगळं आहे.”
-
दरम्यान, गेल्यावर्षीपासून जॉर्जिया आणि अरबाजचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये दोघेही एकत्र आयपीएल सामना पाहण्यासाठी मोहालीला गेले होते.
-
जॉर्जिया एंड्रियानीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या तिच्याकडे कोणताही मोठा प्रोजेक्ट नाही. मात्र, मॉडेलिंग क्षेत्रात तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. याशिवाय अभिनेत्री म्हणून तिने ‘मार्टिन’, ‘वेलकम टू बजरंगपूर’ आणि ‘नॉन स्टॉप धमाल’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
(फोटो सौजन्य: @giorgia.andriani22/instagram)

IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल