-
डिसेंबर महिना सुरू झाला असून २०२३ संपत आले आहे. हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप चांगले गेले. या वर्षात अनेक बॉलिवूड चित्रपट थिएटरमध्ये आले. यापैकी अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले, ज्यांनी अनेक विक्रम मोडीत काढले. इंटरनेट मूव्ही डेटाबेस (IMDB) ने २०२३ च्या टॉप लोकप्रिय चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे, जी थेट OTT वर स्ट्रीम करण्यात आली होती. तर त्या टॉप ७ लोकप्रिय चित्रपटांबद्दल.
-
लस्ट स्टोरी २
तमन्ना, विजय वर्मा आणि काजोल स्टारर चित्रपट ‘लस्ट स्टोरी २’ चे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाला IMDb वर ६.५ रेटींग मिळाले आहेत. -
जाने जान
या यादीत करीना कपूर आणि विजय वर्मा यांचा चित्रपट ‘जाने जान’चे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाला IMDb वर ७ रेटींग मिळाले आहेत. -
मिशन मजनू
या यादीत सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट ‘मिशन मजनू’चे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाला IMDb वर ७.१ रेटींग मिळाले आहेत. -
बवाल
या यादीत वरूण धवन आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट ‘बवाल’चे नाव चौथ्या क्रमांकावर असून या चित्रपटाला IMDb वर ६.६ रेटींग मिळाले आहेत. -
चोर निकल के भागा
यामी गौतम आणि सनी कौशल यांच्या ‘चोर निकल के भागा’चे नाव या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. याला ७.४ रेटींग मिळाले आहेत. -
ब्लडी डॅडी
शाहिद कपूरचा चित्रपटब्लडी डॅडी सहाव्या क्रमांकावर आहे. ज्याला ६.६ रेटींग मिळालं आहे. -
सिर्फ एक बंदा काफी है
या यादीत मनोज बाजपेयी यांचा चित्रपट ‘सिर्फ एक बंदा काफी है’चे नाव सातव्या क्रमांकावर असून या चित्रपटाला IMDb वर ७.९ रेटींग मिळाले आहे. (Photos : Still From Film))

माकडानं पळवला दीड लाखांचा फोन; परत मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, क्षणात फोन परत दिला; Viral VIDEO पाहून पोट धरुन हसाल