-
कार्तिक आर्यनचा नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ सध्या खूप चर्चेत आहे. चाहत्यांनी या चित्रपटातील कार्तिकच्या अभिनयाचे खूप कौतुक केले आहे. हा एक बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे एक मिस्ट्री गर्ल प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. जिच्यासाठी कार्तिक चित्रपटाच्या एका दृश्यात लढत हरतो.
-
चंदू चॅम्पियन हा चित्रपट भारताच्या पहिल्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांचावर आधारित आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारत आहे. जाणून घेऊया चित्रपटातील मिस्ट्री गर्लबद्दल.
-
चित्रपटात कार्तिक आर्यन ऑलिम्पिकसाठी भारताच्या वतीने बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतो आणि यादरम्यान त्याला एक मुलगी भेटते.
-
चित्रपटात कार्तिक आर्यन त्या मुलीच्या प्रेमात पडतो. चित्रपटात ही भूमिका अभिनेत्री आणि मॉडेल भाग्यश्री बोरसे साकारत आहे. चित्रपटाच्या एका दृश्यात कार्तिक आर्यन बॉक्सिंग रिंगमध्ये उतरतो तेव्हा फाईट करताना त्याची नजर भाग्यश्रीवर पडते आणि तो चालू स्पर्धा हारतो.
-
भाग्यश्रीने २०२३ मध्ये ‘यारियाँ 2’ या चित्रपटात कामं केलं आहे. चंदू चॅम्पियनमध्ये तिची छोटीशी भूमिका आहे. परंतु या व्यक्तिरेखेमध्ये ती प्रसिद्धी मिळवण्यात यशस्वी झाली आहे.
-
अभिनेत्री भाग्यश्री लवकरच साऊथ चित्रपट आणि रवी तेजा स्टारर ‘मिस्टर बच्चन’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो : भाग्यश्री बोरसे / इन्स्टाग्राम)

राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाल्या, “भाजपात जाण्याबाबत…”