-
‘इंडियन-२’ हा १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कमल हासन यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘इंडियन’चा सिक्वेल आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २६ कोटींची कमाई केली आहे.
-
एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटात कमल हसन यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे माजी स्वातंत्र्यसैनिक सेनपती यांची भूमिका साकारली आहे. कमल हसन व्यतिरिक्त या चित्रपटात सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंग आणि सूर्या यांच्यासह अनेक कलाकार आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट २५० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. जाणून घेऊया या चित्रपटाच्या स्टारकास्टने किती मानधन आकारले.
-
या चित्रपटातील भूमिकेसाठी कमल हसन यांना १५० कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे.
-
या चित्रपटातून सिद्धार्थने ४ कोटींची कमाई केली आहे.
-
रकुल प्रीत सिंहने ‘इंडियन-२’ चित्रपटात आपल्या भूमिकेसाठी निर्मात्यांकडून सुमारे २ कोटी रुपये घेतले आहेत.
-
या चित्रपटातील कामासाठी स्वत: दिग्दर्शक शंकर यांना अंदाजे ५० कोटी रुपये मिळाले आहेत.

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा