-
कतरिना कैफ एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. १६ जुलै १९८३ रोजी जन्मलेली कतरिना कैफ तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
कतरिना कैफचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यापारी आहेत, तर आई सुझान एक वकील आणि धर्मादाय कार्यकर्ता आहे.
-
परदेशात वाढलेल्या कतरिना कैफने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप सोडली की आज तिची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते.
-
कतरिनाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीतही तिचा समावेश आहे.
-
चित्रपटाव्यतिरिक्त कतरिना कैफ इतर माध्यमातूनही प्रचंड कमाई करते. कटरिना कैफने ९ डिसेंबर २०२१ साली बॉलीवूड अभिनेता विकी कौशशी लग्न केले.
-
विकी कौशल देखील एक यशस्वी अभिनेता आहे पण कतरिना कैफ तिच्या पतीपेक्षा श्रीमंत आहे. जाणून घेऊया कतरिना कैफची एकूण संपत्ती आणि तिच्या उत्पन्नाचे स्त्रोत.
-
मुंबईतील वांद्रे परिसरात कतरिना कैफचे 3 BHK आलिशान अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत सुमारे ८.२० कोटी रुपये आहे. लोखंडवालाजवळही सुमारे १७ कोटी रुपयांची हवाई मालमत्ता आहे.
-
वांद्रे येथे 4 BHK पेंटहाऊस देखील आहे, ज्यामध्ये ती पती विकी कौशलसोबत राहते. कतरिना कैफचा लंडनमध्येही एक बंगला आहे, ज्याची किंमत ७ कोटी रुपये आहे.
-
कतरिना कैफला महागड्या कारची आवड आहे. कतरिना कैफच्या कार कलेक्शनमध्ये ४२ लाख रुपयांची ऑडी, ५० लाख रुपयांची मर्सिडीज, ८० लाख रुपयांची ऑडी Q7 आणि सुमारे अडीच कोटी रुपयांची रेंज रोव्हर कार समाविष्ट आहे.
-
चित्रपटांव्यतिरिक्त, कतरिना ब्रँड एंडोर्समेंट्स, स्टेज शो, स्वतःचा ब्रँड आणि इन्स्टा पोस्टमधून खूप कमाई करते.
-
एका रिपोर्टनुसार, कतरिना कैफची संपत्ती दरवर्षी १३ टक्क्यांनी वाढत आहे. २०१९ फोर्ब्सच्या यादीनुसार, शीर्ष १०० सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत कतरिना कैफ २३ व्या क्रमांकावर आहे.
-
कतरिना कैफ दरमहा सरासरी ३ कोटी रुपये आणि वर्षाला अंदाजे ३० कोटी रुपये कमवते. कतरिना कैफ एका चित्रपटासाठी १२ कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती सुमारे ७ कोटी रुपये घेते.
-
अभिनेत्री असण्यासोबतच कतरिना कैफ एक बिझनेस वुमन देखील आहे. तिचा स्वतःचा ब्युटी ब्रँड आहे, जो कतरिनाने २०१९ मध्ये लॉन्च केला होता. त्यांची कंपनी व्हेगन उत्पादने बनवते. या कंपनीचे वार्षिक उत्पन्न १२ कोटी रुपये आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक कतरिना कैफची एकूण संपत्ती २६३ कोटी रुपये आहे.
-
२०२३ मध्ये विकी कौशलची एकूण संपत्ती ४१ कोटी रुपये असल्याचे आढळून आले. त्यामुळे कतरिना कैफ संपत्तीच्या बाबतीत तिचा पती विकी कौशलपेक्षा खूप श्रीमंत आहे. (All Photos: Katrina Kaif/Instagram)

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच