-
टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री मौनी रॉय आज फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासाठी मौनी रॉय आपला अभ्यास अर्धवट सोडून मुंबईत आली होती.
-
पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या मौनी रॉयने येथे १२वीपर्यंत शिक्षण घेतले, त्यानंतर ती दिल्लीत आली. अभिनेत्रीने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला. मौनीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे तिने आपले शिक्षण अर्धवट सोडले आणि ती मुंबईत आली.
-
मौनी रॉयला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचं होतं. मौनी मधुबाला, माधुरी दीक्षित आणि वहिदा रहमान यांना आपली प्रेरणा मानते. एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने सांगितले होते की, जेव्हा ती मुंबईत आली तेव्हा तिला इतका संघर्ष करावा लागेल असे कधीच वाटले नव्हते. ती अनेकदा तासनतास शूटिंग करत राहायची आणि कधी कधी तिला रडावंसं वाटायचं.
-
मौनी रॉयने २००४ मध्ये ‘रान’ चित्रपटातून पार्श्वभूमी नृत्यांगना म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर २००६ मध्ये, तिला टीव्ही सीरियल ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली ज्यामध्ये त्याने अनाथ कृष्णची भूमिका केली होती.
-
यानंतर मौनी रॉयने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले पण तिला खरी ओळख ‘देवों के देव महादेव’मधील ‘सती’ या व्यक्तिरेखेने मिळाली. यानंतर एकता कपूरच्या ‘नागिन’ या शोमधील मौनी रॉयच्या भूमिकेला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर ‘नागिन-३’ मधील तिची भूमिका प्रेक्षकांना खुप आवडली होती.
-
२०१८ मध्ये ‘गोल्ड’ चित्रपटातून मौनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिला पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. यानंतर अभिनेत्रीने केजीएफ-१, ब्रह्मास्त्र आणि लव्ह सेक्स और धोखा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
-
आज मौनी रॉय एका शोसाठी ४० ते ५० लाख रुपये घेते. एका म्युझिक व्हिडिओसाठी अभिनेत्री ५० लाख ते १ कोटी रुपये घेते.
-
मीडिया रिपोर्ट्सवरनुसार, मौनी रॉय जाहिरातींसाठी सुमारे १० लाख रुपये आकारते. अभिनेत्री एका चित्रपटासाठी सुमारे १ कोटी रुपये घेते.
-
मौनी रॉयने बिझनेसमन सूरज नांबियारसोबत लग्न केले आहे. दोघांचेही मुंबईत दोन रेस्टॉरंट आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त मौनी रॉय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भरपूर कमाई करते. मौनीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीकडे ४५ ते ५० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

पुढील ४७ दिवस शनी देणार नुसता पैसा; ‘या’ राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार अन् नवी नोकरी मिळणार