-
ऑक्टोबर २०२४ हा महिना चित्रपट प्रेमींसाठी खास असणार आहे, कारण या महिन्यात बॉलिवूड आणि हॉलीवूडपासून ते तामिळ आणि तेलुगु चित्रपटांपर्यंत अनेक मोठे आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ॲक्शनपासून रोमान्स आणि थ्रिलर ते सुपरहिरो चित्रपटांपर्यंत सर्व प्रकारचे चित्रपट या महिन्यात थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर एक नजर टाकूया. (Stills From Film)
-
Lucky Baskhar
‘लकी बास्कर’ हा एक तेलुगू भाषेतील ड्रामा थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये दुल्कर सलमान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ३१ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Venom: The Last Dance
‘वेनम: द लास्ट डान्स’ हा अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे, ज्यामध्ये मार्वल कॉमिक्सचे पात्र वेनम दिसणार आहे. हा चित्रपट ‘वेनम’ (२०१८) आणि ‘वेनम: लेट देअर बी कार्नेज’ (२०२१) चा सिक्वेल आहे आणि २५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Ramayana: The Legend of Prince Rama
‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स रामा’ हा १९९३ चा जपान-भारत सह-निर्मित ॲनिमेशन चित्रपट आहे, जो १८ ऑक्टोबर रोजी तामिळ, तेलगू आणि हिंदीसह नव्याने डब केलेल्या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Jigra
‘जिगरा’ हा हिंदी भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये आलिया भट्ट आणि वेदांत रैना मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ११ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Badass Ravi Kumar
बॅडएस रवी कुमार हा एक हिंदी भाषेतील विनोदी चित्रपट आहे ज्यामध्ये हिमेश रेशमिया आणि प्रभु देवा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ११ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Vicky Vidya Ka Woh wala Video
‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा एक हिंदी भाषेतील विनोदी चित्रपट आहे ज्यात राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ११ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Vettaiyan
वेट्टैयन हा तमिळ भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट असून यात रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Joker: Folie à Deux
‘जोकर: फॉलीज अ ड्यूक्स’ हा अमेरिकन म्युझिकल सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे, जो २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘जोकर’ (२०१९) चा सिक्वल आहे आणि जोक्विन फिनिक्स त्याच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे आणि लेडी गागा देखील या चित्रपटात असेल. (Still From Film)
हेही वाचा- Manvat Murders पासून CTRL पर्यंत, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात OTT वर होणार मनोरंजनाचा धमाका!

“आता फक्त जीव घ्यायचा बाकी आहे” महिलांनो कोबीची भाजी घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल