-
सुपरस्टार रजनीकांतच्या खास स्वॅगमुळे जगभरात त्याचे चाहते तयार झाले आहेत. रजनीकांतचा प्रत्येक चित्रपट खास असतो. त्यामुळे त्याच्या ७ सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी कोणताही चित्रपट निवडायला गेलात तर तुम्ही स्वतःच गोंधळून जाल, कारण त्याचा प्रत्येक चित्रपट स्वतःच खूप खास आणि अद्वितीय आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी रजनीकांतच्या अशा ७ चित्रपटांची निवड केली आहे ज्यांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे चित्रपट. (Still from film)
-
सुपरस्टार रजनीकांतचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेट्टयन – द हंटर’ हा चित्रपट यादीत ७ व्या क्रमांकावर आहे, अंदाजे २०० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर जगभरात २०५ कोटी १० लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट अजूनही काही चित्रपटगृहांमध्ये उपलब्ध आहे. (Still from film)
-
२०२० मध्ये रिलीज झालेला ‘दरबार’ हा चित्रपट रजनीकांतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ६ व्या क्रमांकावर आहे. या चित्रपटात रजनीकांतने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. २०० कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने २१९ कोटींचा व्यवसाय केला. (Still from film)
-
या यादीत ५ व्या क्रमांकावर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पेट्टा’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी १३५ कोटी रुपये खर्च आला आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जगभरात २२३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. या चित्रपटात रजनीकांत यांनी हॉस्टेल वॉर्डनची भूमिका साकारली होती. (Still from film)
-
२०१० मध्ये रिलीज झालेला रजनीकांतचा ‘रोबोट’ चित्रपट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अवघ्या १३० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने त्यानंतर बॉक्स ऑफिसवर जगभरात २९० कोटी रुपयांचे कलेक्शन केले. (Still from film)
-
२०१६ मध्ये रिलीज झालेला ‘कबाली’ हा चित्रपट रजनीकांतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुमारे १२० कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने २९५ कोटींचा व्यवसाय केला. (Still from film)
-
गेल्या वर्षी आलेल्या ‘जेलर’ चित्रपटात पुन्हा एकदा रजनीकांतचा अँग्री मॅन अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटासाठी १८० कोटी रुपये खर्च आला आणि सिनेमाने जगभरात ६०५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. त्यामुळे हा चित्रपट यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Still from film)
-
‘रोबोट’ चित्रपटाचा दुसरा भाग २०१८ साली प्रदर्शित झालेला चित्रपट २.o होता जो जगभरातील विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. रजनीकांतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या सिनेमाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने जगभरात ६७५ कोटींचे कलेक्शन होते. (Still from film)

S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”