-
स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) २९ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली.
-
रेश्माने तिच्या लग्नात हिंदीत उखाणा घेतला… “नाग को नचाने के लिए बजाते हैं बीम, अभी शादी हुई हैं पवन से और सब आगयी हैं मेरी रंग माझा वेगळा की टीम”.
-
अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने (Swanandi Tikekar) २५ डिसेंबर २०२३ रोजी गायक आशिष कुलकर्णीबरोबर (Ashish Kulkarni) लग्नगाठ बांधली.
-
“मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर-माहेरची खूण आशिषचं नाव घेते कुलकर्ण्यांची सून…” असा उखाणा स्वानंदीने लग्नात घेतला होता.
-
अभिनेत्री ऋजुता धारपने (Rujuta Dharap) अभिनेता चेतन वडनेरेबरोबर (Chetan Vadnere) लग्नगाठ बांधली.
-
“तिसरी घंटा झाली पडदा उघडला कायमचा, चेतनच्या सोबतीने सुरू करते नवा अंक संसाराचा!” असा सुंदर उखाणा ऋजुताने चेतनसाठी घेतला.
-
अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) व अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) यांचा विवाहसोहळा १ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडला.
-
शिवानी सुर्वेने घेतलेला उखाणा.. “एक वाती एक ज्योती, अजिंक्य माझे पती… मी त्यांची सौभाग्यवती!”.
-
अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांनी आदेश बांदेकरांसाठी (Aadesh Bandekar) घेतलेला छान उखाणा.. “दार उघड बये दार उघड म्हणणारा आदेश आहे तसा भला, दार उघड बये दार उघड म्हणणारा आदेश आहे तसा भला, बांदेकर उभ्या महाराष्ट्रभर फिरता, कधी-मधी आपल्याही घरी येत चला”.
-
‘फुलवंती’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) घेतलेला खास उखाणा.. “आकाशात उडतोय पक्षांचा थवा… आकाशात उडतोय पक्षांचा थवा… लग्नाची सर्व तयारी झाली आहे… पण नवरा मुलगा तर मिळायला हवा…”.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल