-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात झळकलेला लोकप्रिय अभिनेता नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.
-
सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. हास्यजत्रा तसेच मराठी नाटकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता सनीभूषण मुणगेकर विवाहबंधनात अडकला आहे.
-
लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
-
सनीभूषण मुणगेकरने अभिनेत्री दिपश्री कवळेशी लग्नगाठ बांधली आहे.
-
लग्नाच्या फोटोंना या जोडप्याने “श्री व सौ मुणगेकर” असं कॅप्शन दिलं आहे.
-
सनीभूषण आणि दिपश्री या दोघांनी लग्नसोहळ्यात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
दिपश्रीने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
-
दिपश्री ‘बाळुमामाच्या नावाने चांगभलं’, ‘गाथा नवनाथांची’, ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकांमध्ये झळकली आहे. तसेच काही नाटकांमध्ये देखील तिने भूमिका साकारल्या आहेत.
-
तर, सनीभूषण मुणगेकर सध्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात काम करतोय. याआधी त्याने हास्यजत्रेसह ‘सन मराठी’ वाहिनीच्या ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेत सुद्धा काम केलेलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सनीभूषण मुणगेकर व दिपश्री इन्स्टाग्राम अकाऊंट )
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”