-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेता रोहित माने घराघरांत लोकप्रिय झाला.
-
अभिनेत्याने गेल्यावर्षी नवीन घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली होती.
-
आता नवीन घर घेतल्यानंतर अभिनेत्याच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालेलं आहे.
-
नवीन वर्षात रोहित माने याने ‘Thar’ ही आलिशान गाडी खरेदी केली आहे.
-
सोशल मीडियावर नवीन गाडी खरेदी करतानाचे फोटो शेअर करत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.
-
यावेळी रोहितबरोबर त्याची पत्नी व कुटुंबीय उपस्थित होते.
-
रोहितने नवीन गाडी खरेदी करतानाच्या व्हिडीओला “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी” असं हटके कॅप्शन दिलं आहे.
-
रोहितने बायकोसह या नव्या थारची शोरुममध्ये पूजा केली आणि त्यानंतर गाडीसह फोटोशूट केलं.
-
नवीन गाडी घेतल्याबद्दल सध्या रोहितवर त्याचे चाहते, मराठी कलाविश्वातील कलाकार तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या सहकलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रोहित माने इन्स्टाग्राम व Pineapple_studios10 )

Chhaava : कसा आहे ‘छावा’ चित्रपट? विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक म्हणाले…