-
‘ठरलं तर मग’ मालिकेत अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे लवकरच आई होणार आहे.
-
मालिकेच्या सेटवर नुकतंच मोनिका दबडेचं डोहाळेजेवण पार पडलं.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेतल्या सगळ्या अभिनेत्रींनी मिळून मोनिकासाठी खास डोहाळेजेवणाचं सरप्राइज प्लॅन केलं होतं.
-
डोहाळेजेवणासाठी अभिनेत्री छान नटून-थटून तयार झाली होती. सुंदर साडी नेसून, त्यावर मोनिकाने फुलांचे दागिने घातले होते. तसेच तिच्या साडीवर ‘आई’ नाव लिहिलेला बॅच लावण्यात आला होता.
-
“ज्या क्षेत्रात आपण काम करतो, तिथल्या मैत्रिणींकडून असं जेव्हा कौतुक होतं, तेव्हा मला खरंच वाटतं की मी किती भाग्यवान आहे. माझ्या आईने जेवढ्या आवडीने माझं डोहाळे जेवण केलं असतं, त्याच्या दुपटीने या माझ्या मैत्रिणींनी माझं सगळं केलं.” अशी पोस्ट लिहित मोनिकाने डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
जुई गडकरी, ज्योती चांदेकर, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, श्रद्धा केतकर, दिना दानडे, मयुरी मोहिते, केतकी पालव अशा ‘ठरलं तर मग’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या सगळ्या अभिनेत्री मोनिकाच्या डोहाळेजेवणासाठी एकत्र जमल्या होत्या.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी देखील मोनिकाच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाला खास उपस्थिती लावली होती.
-
“मी आणि चिन्मय आयुष्यभर हे लक्षात ठेऊच पण, माझ्या बाळाला हे नक्की सांगू की, या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम नेहमी तुझ्या पाठीशी आहेत.” अशा भावना मोनिकाने व्यक्त केल्या आहेत.
-
संपूर्ण कलाविश्वातून सध्या मोनिका दबडेवर आणि ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबडे इन्स्टाग्राम )
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”