-
गोध्रा रेल्वे आगीवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट ११ जानेवारी २०२५ रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.
-
नेटफ्लिक्सवरील ‘IC 814: The Kandahar Hijack’ ही वेब सिरीज १९९९ मध्ये घडलेल्या एका भारतीय विमानाच्या अपहरणाच्या सत्य घटनेवर आधारित आहे.
-
निठारी हत्याकांडावर आधारित विक्रांत मॅसीचा सेक्टर ३६ हा सिनेमा तुम्हाला प्रचंड रोमांचित करेल. हा चित्रपट Netflix वर उपलब्ध आहे.
-
‘ट्रायल बाय फायर’ ही सिरीज त्या पालकांबद्दल आहे ज्यांनी १९९७ च्या उपहार सिनेमा हॉलच्या आगीत त्यांची दोन मुले गमावली. ते त्यांच्या न्यायासाठी दिलल्या लढ्याबद्दल यामध्येल भाष्य करण्यात आले आहे. ही सिरीजही Netflix वर पाहता येईल.
-
डिस्नी प्लस हॉटस्टारवरील ‘आखरी सच’ ही सिरीज बुरारी मृत्यू प्रकरणावर आधारित आहे, ज्यामध्ये एका घरातील ११ सदस्यांनी एकत्र आत्महत्या केली होती.
-
नेटफ्लिक्सवरील ‘स्कूप’ ही पत्रकार जिग्ना व्होराच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. ज्यांच्यावर रिपोर्टर ज्योतिर्मय डे यांच्या हत्येचा खोटा आरोप करण्यात आला होता.
-
‘स्कॅम १९९२’ SonyLIV वर उपलब्ध आहे. हर्षद मेहता आणि शेअर बाजारावर आधारित हा ड्रामा अजिबात चुकवू नका.
-
‘दिल्ली क्राईम’चा पहिला सीझन निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावर आधारित आहे. ही सिरीज Netflix वर आहे.
-
नेटफ्लिक्सवरील ‘रेल्वे मन’ ही भोपाळ वायू दुर्घटनेची भीषण कहाणी आहे.
-
Rocket Boys SonyLIV वर उपलब्ध आहे. ही वेब सिरीज डॉ. होमी जहांगीर भाभा आणि विक्रम अंबालाल साराभाई यांच्यावर आधारित आहे.
