-
‘लय आवडतेस तू मला’ या मालिकेत सध्या सानिका व सरकारची लव्ह स्टोरी सध्या पाहायला मिळत आहे.
-
मालिकेत सानिकाने सरकारला नुकतेच वाढदिवसानिमित्त एक गोड सरप्राईज दिल्याचे पाहायला मिळाले.
-
सानिकासाठी सरकारचा हा वाढदिवस खास आहे.
-
सरकारच्या वाढदिवसासाठी सानिकाने विशेष तयारी केल्याचे पाहायला मिळाले.
-
तिने संपूर्ण गार्डन खूप सुंदररित्या सजवले.
-
सानिकाने सरकारसाठी खास एक ग्रीटींग कार्ड बनवले आहे.
-
या ग्रीटींग कार्डमधून तिने तिच्या सरकारबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
ज्यात तिने त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
सरकार आणि सानिकाची ही केमिस्ट्री सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य: कलर्स मराठी)

Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”