-
भारताचा माजी फिरकीपटू झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे आता चित्रपट करिअरकडे पुन्हा लक्ष देत आहे.
-
तिच्या आगामी हिंदी चित्रपटातील लूक तिने इन्स्टाग्रावरून शेअर केला आहे.
-
तिचा हा लूक पाहून चाहत्यांचीही उत्सुकता शिगेला गेली आहे.
-
‘ललाट’ असं तिच्या या चित्रपटाचं नाव आहे.
-
जयवी धांडा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
-
जयवी धांडा हे ‘नीधी सिंग’ (२०१६) आणि ‘ड्रामेबाज कलाकार’ (२०१७) या चित्रपटांसाठी ओळखले जातात.
-
दरम्यान सागरिकानहे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, ‘माझ्या नवीन चित्रपट ‘ललाट’मधील लूक तुम्हा सर्वांसमोर आणताना मी अस्वस्थ आणि उत्साही अशा मिश्रित भावनेत अडकले आहे.”
-
तिच्या लूकवरून चित्रपटाची कथा राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित दिसत आहे.
-
दरम्यान सागरिका शेवटची स्कीनवर ‘इरादा’ या २०१७ मधील हिंदी चित्रपटात दिसली होती.
-
सागरिकाने ‘चक दे इंडिया’, ‘फॅशन’, ‘शादी के बाद’, आणि ‘गोलमाल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (सर्व फोटो साभार-सागरिका घाटगे खान इन्स्टाग्राम) हेही पाहा- Bigg Boss 18 चा विजेता करणवीर मेहराचं शिक्षण ते नावातील बदल, त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या…

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक