-
तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एक्झिट घेतली. तिच्याजागी या मालिकेत आता अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ता कोळी हे पात्र साकारत आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता कोळीचा पती सागर कोळी ही व्यक्तिरेखा अभिनेता राज हंचनाळे साकारत आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे राजचा सुद्धा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापूर्वी त्याने ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत राणादाचा भाऊ सूरज ( सन्नी दा ) ही भूमिका साकारली होती.
-
छोट्या पडद्यामुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या राज हंचनाळेच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला तुम्ही पाहिलं आहेत का? या जोडप्याबद्दल जाणून घेऊयात…
-
राज हंचनाळे वैयक्तिक आयुष्यात २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकला.
-
राजने २०१९ मध्ये मनिषा म्हणजे मॉली डेस्वालशी लग्नगाठ बांधली. या दोघांचं लव्हमॅरेज असून, लग्नाआधी सहा वर्षे हे दोघंही एकमेकांना ओळखत होते.
-
राज हंचनाळे मराठी कलाविश्वात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. तर, मॉली ही हरियाणाची आहे. दोघंही एकमेकांना २०१३ पासून ओळखत होते.
-
मॉली ही स्केच आर्टिस्ट आहे. तिने काढलेली सुंदर चित्रे व स्केच ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
राज आणि मॉलीच्या फोटोंवर नेटकरी कायमच लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव करत असतात. ( सर्व फोटो सौजन्य : Manisha Deswal/ raj hanchanale इन्स्टाग्राम )

Chhaava Review : नि:शब्द करणारा क्लायमॅक्स, विकी कौशलचा दमदार अभिनय पण, रश्मिका…; ‘छावा’मध्ये ‘या’ गोष्टीची जाणवली कमी