-
मराठी कलाविश्वात सध्या अभिनेत्री शिवानी सोनारच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
शिवानी सोनार नुकतीच ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता अंबर गणपुळेसह विवाहबंधनात अडकली.
-
लग्नसोहळ्यात शिवानीने खास पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
हिरव्या रंगाची नऊवारी साडी, हातात चुडा, गळ्यात भरजरी दागिने, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.
-
शिवानीच्या लूकच सोशल मीडियावर देखील भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
-
या सगळ्यात अभिनेत्रीच्या गळ्यातील मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
शिवानीचं नाजूक अन् सुंदर डिझाईन असलेलं मंगळसूत्र फोटोंमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
शिवानी आणि अंबरच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते.
-
सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार, twoseaters.in, madhurikhese makeupartist इन्स्टाग्राम )

Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”