-
झी मराठी वाहिनीने ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील जान्हवी आणि जयंतच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘पारु’ या मालिकांचा महासंगम २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५ असा होणार आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी जान्हवी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकरने जांभळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
या लेहेंग्यावर दिव्याने हिरव्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.
-
तसेच जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधवने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर कोट परिधान केला आहे.
-
मालिकेत विश्वा या पात्राचे जान्हवीवर मनापासून प्रेम असते, परंतु तो तिला कधीही बोलून दाखवीत नाही.
-
विश्वा जान्हवीच्या लग्नाला पोहोचला आहे.
-
‘पारू’ या मालिकेतील विश्वाचा मित्र प्रीतम त्याला काही मदत करू शकेल का, विश्वाला त्याचे प्रेम मिळेल का, याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/ इंस्टाग्राम)

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?