-
सिनेमासृष्टीत मनीष मल्होत्रा यांचे नाव खूप मोठे आहे. मनीष मल्होत्रा हे एक सेलिब्रिटी डिझायनर आहेत. मनीष मल्होत्रा यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी साडीवरचे प्रेम व्यक्त करताना त्यांनी डिझाइन केलेल्या साड्यांमध्ये अभिनेत्रींचे मोहक फोटो पोस्ट केले आहेत.
-
प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेली गुलाबी रंगाची आणि जरी वर्क असलेली सिल्क साडी परिधान केली आहे.
-
बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे रेखा. या फोटोमध्ये रेखाने मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेली कांजीवरम साडी परिधान केली आहे.
-
‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री करीन खानने गडद चंदेरी व सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे.
-
‘देसी गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने गुलाबी रंगाची शिफॉन साडी परिधान केली आहे.
-
कतरिना कैफ हिने गुलाबी रंगाची रेशमी आणि जरदोसी यांची एम्ब्रॉयडरी असलेला कॉर्ड सेट परिधान केला आहे. हा कॉर्ड सेट कतरिनाने साडीप्रमाणे ड्रेप केला आहे.
-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने चंदेरी साडी परिधान केली आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री क्रिती सेनॉनने पिवळ्या रंगाची मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेली साडी परिधान केली आहे. नेटकऱ्यांचे लक्ष वेधले ते क्रितीने परिधान केलेल्या मोतीने सजवलेल्या ब्लाऊजमुळे.
-
प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीने तपकिरी रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर हिने सोनेरी रंगाची कांजीवरम साडी परिधान केली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : मनीष मल्होत्रा/ इंस्टाग्राम)