-
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिला महाकुंभात किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर हे पद दिले होते, जे नंतर वादांमुळे मागे घेण्यात आले. या वादामुळे ममता कुलकर्णीचा जुना भूतकाळही पुन्हा चर्चेत आला आहे. (Photo: Mamta Kulkarni/Instagram)
-
एकेकाळी बॉलिवूडची सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री मानली जाणारी ममता कुलकर्णी अनेकदा वादात सापडली आहे. यातील सर्वात प्रसिद्ध विवाद तिच्या टॉपलेस फोटोशूटचा होता, ज्याने खूप खळबळ उडवून दिली होती. (Photo: Mamta Kulkarni/Instagram)
-
अलीकडेच ती या फोटोशूटबद्दल मोकळेपणाने बोलली आणि हे शूट केले तेव्हा तिचे वय किती होते आणि त्यावर तिला कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या हेही सांगितले आहे. (Photo: Mamta Kulkarni/Instagram)
-
ममता कुलकर्णीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात सेमी-न्यूड फोटोशूट केले होते, जे स्टारडस्ट मासिकाच्या कव्हर पेजवर प्रसिद्ध झाले होते. हे फोटोशूट त्या काळात खूपच धक्कादायक होते कारण त्यावेळी बॉलीवूड अभिनेत्रींनी इतके बोल्ड फोटो क्लिक केले नव्हते. (Photo: Mamta Kulkarni/Instagram)
-
हे फोटोशूट समोर येताच मीडिया आणि समाजात खळबळ उडाली होती. अनेकांनी या कृतीला अश्लील म्हटले होते. नुकतेच ममता कुलकर्णीने तिच्या टॉपलेस फोटोशूटबद्दल उघडपणे सांगितले. रजत शर्मा यांच्या शो ‘आपकी अदालत’मध्ये तिने सांगितले की, जेव्हा तिने हे शूट केले तेव्हा ती नववीत शिकत होती. (Photo: Aap Ki Adalat Show)
-
ती म्हणाली, “जेव्हा स्टारडस्टचे लोक माझ्याकडे आले, तेव्हा त्यांनी मला डेमी मूरचे फोटोशूट दाखवले. मला त्यात कोणतीही अश्लीलता दिसली नाही. त्यावेळी मी अगदी निरागस होते कारण माझे फक्त शालेय शिक्षण झाले होते. मी ९वीत होते. (Photo: Mamta Kulkarni/Instagram)
-
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी त्यावेळीही मी अजूनही व्हर्जिन आहे असेही विधान केले होते. पण लोकांना हे पचनी पडू शकले नाही. लोकांना वाटते की बॉलीवूडमध्ये येण्यासाठी काहीही करावे लागते, पण माझे तसे नव्हते. (फोटो स्त्रोत: स्टारडस्ट मॅगझिन)
-
ती पुढे म्हणाली, “मी एका सधन कुटुंबातून आले आहे. माझे वडील ३५ वर्षे ठाण्याचे परिवहन आयुक्त होते, त्यामुळे मला बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतीही तडजोड करावी लागली नाही. मला सेक्स, नग्नता आणि काय हे माहित नव्हते.” (Photo: Mamta Kulkarni/Instagram)
-
अभिनेत्री पुढे म्हणाली, “जोपर्यंत एखादी व्यक्ती लैंगिकदृष्ट्या जागरूक होत नाही तोपर्यंत त्याला या सर्व गोष्टी चुकीच्या वाटत नाहीत. जेव्हा ही जाणीव येते, तेव्हाच लोक कपड्यांशिवाय राहणे अश्लील मानू लागतात.” (Photo: Mamta Kulkarni/Instagram)
-
हे वक्तव्य करून तिने हे दाखवण्याचा प्रयत्न केला की तिचे हे फोटोशूट एक कलात्मक अभिव्यक्ती होती आणि त्याचा अश्लीलतेशी काहीही संबंध नाही. ममता कुलकर्णीचे हे फोटोशूट समोर आल्यानंतर ममताला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. (Photo: Mamta Kulkarni/Instagram)
-
टॉपलेस फोटोशूटशिवाय ममता कुलकर्णीचे नाव ड्रग्ज आणि अंडरवर्ल्डशीही जोडले गेले होते. तिचे नाव ड्रग डिलर विक्की गोस्वामीशी जोडले गेले होते आणि अवैध धंद्यात सहभागी असल्याचा आरोप होता. (Photo: Mamta Kulkarni/Instagram)
-
दरम्यान, तिने या सर्व आरोपांमधून स्वतःला निर्दोष घोषित केले. आता ममता कुलकर्णीने आध्यात्मिक जीवन स्वीकारले आहे. महाकुंभात तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली होती, परंतु वादांमुळे ती पदवी परत घेण्यात आली. (Photo: Mamta Kulkarni/Instagram)
(हे देखील वाचा: शाहरुख खानचे ‘हे’ ५ चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकले नाही, यादीत एक हॉलिवूड सिनेमाही!

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…