-
ममता कुलकर्णी नुकतीच लोकप्रिय टीव्ही शो आप की अदालतमध्ये दिसली. यावेळी तिने अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यात तिच्या वादग्रस्त फोटोशूटपासून महामंडलेश्वर या पदावरून हटवण्यापर्यंतच्या प्रश्नांचा समावेश आहे.
-
टॉपलेस फोटोशूट
या मुलाखतीत ममता म्हणाली, “जेव्हा स्टारडस्टचे लोक माझ्याकडे आले, तेव्हा त्यांनी मला डेमी मूरचे फोटोशूट दाखवले. मला त्यात कोणतीही अश्लीलता दिसली नाही. त्यावेळी मी अगदी निरागस होते कारण माझे फक्त शालेय शिक्षण झाले होते. मी ९वीत होते. मी त्यावेळीही मी अजूनही व्हर्जिन आहे असेही विधान केले होते. पण लोकांना हे पचनी पडू शकले नाही. लोकांना वाटते की बॉलीवूडमध्ये येण्यासाठी काहीही करावे लागते, पण माझे तसे नव्हते. -
महामंडलेश्वर होण्यासाठी १० कोटी रुपये दिले?
महामंडलेश्वर होण्यासाठी किन्नर आखाड्याला १० कोटी रुपयांची मोठी रक्कम दिल्याचा आरोप ममता कुलकर्णीने फेटाळून लावला. -
शोमध्ये ती म्हणाली, “१० कोटी रुपये सोडा, माझ्याकडे एक कोटीही नाहीत. माझी बँक खाती गोठवण्यात आली आहेत. जेव्हा मला महामंडलेश्वर बनवले गेले तेव्हा मला माझ्या गुरूला दक्षिणा देण्यासाठी २ लाख रुपये उसने घ्यावे लागले.” (Photo: Aap ki Adaalat)
-
बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार का?
शोमध्ये जेव्हा ममताला चित्रपट क्षेत्रात परतण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने नकार दिला. (Photo: Mamta Kulkarni/Instagram) -
ममता म्हणाली, “आता मी पूर्ण संन्यासी आहे. दुधाचे तुपात रूपांतर झाल्यावर त्याचे मूळ स्वरूप जसे परत येत नाही, त्याचप्रमाणे मीही चित्रपटांकडे न परतण्याचा निर्णय घेतला आहे. मी २३ वर्षे तपस्वी म्हणून जगले आहे.” (Photo: Mamta Kulkarni/Instagram)
-
करण-अर्जुन या चित्रपटाबद्दल म्हणाली..
ममता तिच्या करण-अर्जुन या चित्रपटाबद्दल बोलली. तिने शाहरुख आणि सलमानला फटकारल्याची गोष्टही शेअर केली. (Photo: Mamta Kulkarni/Instagram) -
तिने सांगितले की करण-अर्जुन चित्रपटाचा कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश होता, एके दिवशी त्याने ममताला खोलीत बोलावले. ममताने सांगितले की, जेव्हा ती तिच्या खोलीकडे जात होती, तेव्हा शाहरुख आणि सलमान तिच्या जवळून जात होते. दोन्ही स्टार्स त्यांच्याकडे पाहून हसले आणि त्या दोघांना पाहून ममता म्हणाली, “मला धक्का बसला, पण मी काहीच बोलले नाही.”(Photo: Mamta Kulkarni/Instagram)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…