पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम सध्या दुबईत सुरू असलेल्या कॉन्सर्टमुळे चर्चेत आला आहे.कॉन्सर्टचे काही व्हिडिओही त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.आतिफ अस्लमने त्याच्या दुबई कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या ‘दिल से’ चित्रपटातील एक गाणेही गायले.आता आतिफ अस्लम भारतीय गायक हनी सिंग आणि अमेरिकन गायक जेसन डेरुलोसोबत दिसला आहे.दरम्यान, जेसन डेरुलोने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिन्ही गायक एकत्र पोज देताना दिसत आहेत.यादरम्यान तिघांनीही एकत्र डिनर केले आणि आता त्यांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.चाहत्यांना तिन्ही गायकांची ही छायाचित्रे खूप आवडली आहेत आणि त्यांच्या पोस्टवर खूप प्रेमाचा वर्षाव होत आहे.(सर्व फोटो साभार- जेसन डेरुलो इन्स्टाग्राम)हेही पाहा- Photos : ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! संगीतकार अजय-अतुल यांनी कुटुंबासह घेतलं दख्खनचा राजाचं दर्शन, फोटो व्हायरल