-
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे स्वप्नील जोशी.
-
वयाच्या नवव्या वर्षांपासून स्वप्नील अभिनय क्षेत्रात अविरत काम करत आहेत. आजवर त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
-
येत्या काळातही स्वप्नील हटके भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे.
-
सध्या स्वप्नील राजकीय नेत्यांच्या भेटी घेताना दिसत आहे. २ फेब्रुवारीला त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. याचा व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.
-
त्यानंतर स्वप्नील जोशीने नुकतीच महसूल मंत्री आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
बावनकुळेंबरोबरच्या भेटीचे फोटो शेअर करत स्वप्नील जोशी म्हणाला, “नागपूर भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर भेटण्याचा योग आला. त्यांच्यासह संवाद साधण्याची आणि त्यांच्या उत्तम आतिथ्याचा आनंद घेण्याची संधी मिळाली. ही नक्कीच एक अविस्मरणीय आठवण ठरली.”
-
स्वप्नील जोशीचे चंद्रशेखर बावनकुळेंबरोबरच्या भेटीचे फोटो सध्या खूप चर्चेत आले आहेत.
-
स्वप्नील चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीचे फोटो शेअर करत म्हणाला, “त्यांच्या घरातील प्रेम आणि जिव्हाळा असाच कायम राहो. असे प्रेम आणि स्नेह येत्या अनेक वर्षांपर्यंत लाभत राहो, हीच देवाकडे प्रार्थना!”
-
सर्व फोटो सौजन्य – स्वप्नील जोशी इन्स्टाग्राम

Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”