-
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावा लवकरच प्रदर्शित होत आहे. (Still From Trailer)
-
या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. (Still From Trailer)
-
चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. (Still From Trailer)
-
दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळेल. दिग्दर्शक म्हणून उत्तेकर यांनी कोणत्या मराठी अभिनेत्यांना चित्रपटात संधी दिली आहे ते जाणून घेऊयात. (Still From Trailer)
-
अभिनेता संतोष जुवेकर रायाजी बांदल या भूमिकेत दिसेल. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)
-
याशिवाय अभिनेता अस्ताद काळे, सुवृत जोशी, सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे, आशिष पाथोडे, मनोज कोलटकर, किरण करमरकर, यासारखे दिग्गज मराठी चेहरे या चित्रपटात दिसणार आहेत. (Still From Trailer)
-
याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर यादेखील चित्रपटात झळकणार आहेत. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)
-
हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. (Still From Trailer)
-
चित्रपटात मराठी कलाकार असल्याने आणि सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असल्याने चित्रपटाला राज्यातून मोठा फायदा होईल असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे. (Still From Trailer)

Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”