-
नेहा शर्माच्या जर्मन सुट्टीत इतिहासाची झलक पाहायला मिळत आहे, तिने फ्रँकफर्टमधील प्रतिष्ठित दास गोएथे हाऊसला भेट दिली आहे. हे संग्रहालय नक्की भेट देण्यासारखे का आहे? चला जाणून घेऊया. (Source: Instagram/@nehasharmaofficial)
-
हे ठिकाण म्हणजे जर्मनीतील सर्वात महत्त्वाच्या लेखकांपैकी एक असलेल्या जोहान वुल्फगँग फॉन गोएथे यांचे जन्मस्थान आणि बालपणीचे घर आहे. (Source: Instagram/@nehasharmaofficial)
-
मूळतः १६१८ च्या सुमारास बांधलेले, १८ व्या शतकात त्याचे बरोक शैलीमध्ये नूतनीकरण करण्यात आले. (Source: Instagram/@nehasharmaofficial)
-
हे घर १८६३ पासून एक संग्रहालय आहे आणि आता ते फ्रँकफर्टमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक ठरले आहे. (Source: Instagram/@nehasharmaofficial)
-
संग्रहालयात प्राचीन काळातील फर्निचर आणि कलाकृती आहेत, ज्यामुळे पर्यटकांना गोएथे आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनाची झलक अनुभवता येते. (Source: Instagram/@nehasharmaofficial)
-
दुसऱ्या महायुद्धात हे घर उद्ध्वस्त झाले होते, परंतु १९५० च्या दशकात ते पुन्हा बांधण्यात आले. (Source: Instagram/@nehasharmaofficial)
-
गोएथे संग्रहालय गोएथे हाऊसच्या शेजारी आहे आणि त्यात गोएथे यांच्या स्मृतिंचा संग्रह आहे. (Source: Instagram/@nehasharmaofficial)
-
गोएथे हाऊस समजून घेण्यासाठी तिथे विविध भाषांमधील गाईड आहेत त्यांच्याकडून पर्यटक घराचा इतिहास आणि गोएथेच्या जीवनाबद्दल जाणून घेऊ शकतात. (Source: Instagram/@nehasharmaofficial)
-
गोएथे यांनी “द सॉरोज ऑफ यंग वेर्थर” आणि “फॉस्ट” यासह त्यांचं प्रसिद्ध ठरलेलं लेखन इथेचं केलं आहे. (Source: Instagram/@nehasharmaofficial)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का