-
Zee Chitra Gaurav Puraskar 2025: ‘झी चित्र गौरव २०२५’ हा पुरस्कार सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा करण्यात आला.
-
झी गौरव पुरस्काराच्या २५ वर्षांचा समृद्ध इतिहासासह, यावेळी मराठी चित्रपट जगतातील तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर प्रतिभावान व्यक्तींच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
-
या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रितेश देशमुखला एक सरप्राईझ देण्यात आले.
-
रितेशचे वडिल विलासराव देशमुख यांच्याबरोबर असलेल्या घनिष्ठ नातेसंबंधावर प्रकाश टाकणारे पत्रवाचन झाले.
-
रितेशच्या कामगिरीबद्दल वडिलांकडून अभिमान आणि कौतुक व्यक्त करण्यात आले.
-
या मंचावर ‘श्रीवल्ली’चे डोहाळे जेवण पार पडले. अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी ‘श्रीवल्ली’ला शुभाशीर्वाद दिले.
-
अभिनेता श्रेयस तळपदे व पुष्पाची खास भेट झाली. त्यांच्यात झालेला तो संवाद खूपच गाजला.
-
अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि सिद्धार्थ जाधव याचे खास सादरीकरण झाले.
-
या गौरव सोहळयात अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि गौतमी देशपांडे यांचा एक अद्वितीय नृत्य अनुभवता येणार आहे.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निवेदिता सराफ यांच्या अभिनयाच्या प्रवासासाठी मानवंदना दिली.
-
अभिनेत्री ते पत्नी, आई असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आणि रुपेरी पडद्यावर त्यांचे उल्लेखनीय पुनरागमन यावर सादरीकरण केले.
-
सचिन आणि सुप्रिया यांनी निवेदिता सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार दिला.
-
हा दिमाखदार सोहळा प्रेक्षकांना ८ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘शालिनी’ फेम माधवी निमकरच्या काळ्या बॅकलेस गाऊनमध्ये अदा)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल