-
बॉलिवूडमध्ये असे काही स्टार आहेत जे नेहमीच त्यांच्या अभिनय, कामाप्रती समर्पण आणि चित्रपटांच्या दर्जामुळे एक वेगळी ओळख निर्माण करून आहेत. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान, जो ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ या नावाने ओळखला जातो. त्याचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी झाला आणि त्याने त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि उत्कृष्ट अभिनय कौशल्याने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्याला हा मिस्टर परफेक्शनिस्टचा खास टॅग कसा मिळाला? यामागे एक रंजक कथा लपलेली आहे. आमिर खान (फोटो : आमिर खान प्रॉडक्शन्स/फेसबुक)
-
आमिरला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ हा टॅग कसा मिळाला?
आमिर खानने अलीकडेच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये खुलासा केला की हा टॅग (बिरुद) त्याला ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी दिला होता. ही घटना ‘दिल’ (१९९०) चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडली. तेव्हा आमिर खान दिग्दर्शक इंद्र कुमारबरोबर काम करत होता आणि बाबा आझमी (शबाना आझमी यांचे भाऊ) चित्रपटाचे कॅमेरामन होते. (फोटो : आमिर खान प्रॉडक्शन्स/फेसबुक) -
एके दिवशी आमिर खान चित्रपटाच्या पटकथेवर चर्चा करण्यासाठी बाबा आझमींच्या घरी गेला. संभाषणादरम्यान शबाना आझमी यांनी आमिरला विचारले की त्याला त्याच्या चहामध्ये किती साखर हवी आहे. पण आमिर चित्रपटाची चर्चा करण्यात इतका मग्न होता की त्याला लगेच उत्तर देता आले नाही. (फोटो : आमिर खान प्रॉडक्शन्स/फेसबुक)
-
जेव्हा त्याला शबाना आझमींचा प्रश्न समजला तेव्हा त्याने परत विचारले, “कप किती मोठा आहे?” त्यानंतर शबाना यांनी त्याला कप दाखवला तेव्हा आमिरने पुढचा प्रश्न विचारला – “चमचा किती मोठा आहे?” यानंतर, त्याने योग्य प्रमाणात साखर घालण्यास सांगितले. (फोटो : आमिर खान प्रॉडक्शन्स/फेसबुक)
-
ही घटना पाहून शबाना आझमी हसून म्हणाल्या की आमिर प्रत्येक गोष्टीत इतका तपशील आणि परिपूर्णता शोधतो की त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटलं पाहिजे. तेव्हापासून हे नाव आमिर खानशी जोडलं गेलं आणि हळूहळू हे नाव संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाले. (फोटो : आमिर खान प्रॉडक्शन्स/फेसबुक)
-
”मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजे काय?
इंग्रजीमध्ये ‘मिस्टर’ हा शब्द एखाद्या व्यक्तीचा आदर करण्यासाठी वापरला जातो. (उदा. मराठीत नावापुढे श्री लावतो) तर ‘परफेक्शनिस्ट’ हा शब्द ‘परफेक्ट’ या इंग्रजी शब्दापासून आला आहे आणि ‘परफेक्शनिस्ट’ चा अर्थ असा आहे – अशी व्यक्ती जी प्रत्येक काम परिपूर्ण असते. आमिर खानला हे नाव देण्यात आले कारण तो त्याच्या प्रत्येक कामात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न करतो. (फोटो : आमिर खान प्रॉडक्शन्स/फेसबुक) -
आमिर खानला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ का म्हणतात?
आमिर खानला हे बिरूद केवळ एका मजेदार घटनेमुळे मिळालेलं नाही, तर त्याच्या चित्रपट कारकिर्दीत अशी अनेक कारणे आहेत जी त्याला या टोपणनावासाठी पात्र ठरवता. (फोटो : आमिर खान प्रॉडक्शन्स/फेसबुक) -
प्रत्येक भूमिका लक्षात राहण्याजोगी
आमिर खान त्याचे प्रत्येक पात्र पूर्ण ताकदीने साकारतो. ‘लगान’मधील भुवन असो, ‘गजनी’मधील संजय सिंघानिया असो किंवा ‘दंगल’मधील महावीर फोगाट यांची व्यक्तिरेखा असो – तो प्रत्येक भूमिकेत स्वतःला पूर्णपणे झोकून देतो आणि त्याचं पात्र वास्तववादी बनवतो. (फोटो : आमिर खान प्रॉडक्शन्स/फेसबुक) -
पटकथेवर मजबूत पकड
आमिर खान फक्त चांगल्या आणि दमदार पटकथा असलेले चित्रपट निवडतो. तो आशयाला खूप महत्त्व देतो आणि जर एखादी पटकथा त्याला प्रभावित करत नसेल तर तो ती नाकारण्यास मागेपुढे पाहत नाही. (फोटो : आमिर खान प्रॉडक्शन्स/फेसबुक) -
चित्रपट निर्मितीतील परिपूर्णता
आमिर केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर एक उत्तम दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. त्याचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, ज्यामध्ये त्यानी केवळ अभिनयच केला नाही तर दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली होती आणि प्रेक्षकांना एक मास्टरपीस दिला. (फोटो : आमिर खान प्रॉडक्शन्स/फेसबुक) -
‘दंगल’साठी केलेली भरपूर मेहनत
आमिर खान त्याच्या चित्रपटांसाठी जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करतो. ‘गजनी’ साठी त्याने एक मजबूत शरीरयष्टी तयार केली होती, तर ‘दंगल’ साठी ९७ किलोपर्यंत वजन वाढवले आणि नंतर तरुण महावीर फोगाट यांच्या भूमिकेसाठी पुन्हा पिळदार शरीरयष्टी कमावली. ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये त्याने स्वतःला पूर्णपणे दुबळ्या व्यक्तिरेखेशी जुळवून घेतले. (फोटो : आमिर खान प्रॉडक्शन्स/फेसबुक) -
एका वर्षात अनेक चित्रपट करण्याऐवजी, आमिर खान फक्त असे चित्रपट निवडतो जे सर्वोत्तम असतात, जे प्रेक्षकांना काहीतरी नवीन देतात. म्हणूनच त्यांचे बहुतेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतात आणि दीर्घकाळ लोकांच्या मनात राहतात. तो एकेका चित्रपटासाठी अनेक वर्षे मेहनत करतो.

Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल