-
मराठी अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) व अभिनेत्री गौरी नलावडेचा (Gauri Nalawade) ‘गाव बोलावतो’ (Gaav Bolavato) हा चित्रपट आज (२१ मार्च) प्रदर्शित झाला.
-
शेतीवर आणि गावावर निस्सीम प्रेम करणारे वडिल, पैसे कमावण्याच्या हेतूने गावातून बाहेर पडलेला मुलगा आणि त्यानंतर गावाला आपली गरज आहे, या जाणीवेने पुन्हा गावात आलेला तोच मुलगा आणि गावातील इतर मंडळी यांच्या गोष्टींवर बेतलेला हा चित्रपट आहे.
-
गाव बदलत जातं, पण मातीचा गंध आणि माणसांची नाळ तशीच राहते! गोष्ट आपल्या मातीची…!! अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद माणिकराव (Vinod Manikrao) यांनी केले आहे.
-
‘गाव बोलावतो’ चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्त भूषण व गौरीने रोमँटिक फोटोशूट (Romantic Photoshoot) केले होते.
-
या फोटोशूटसाठी गौरीने पिवळ्या रंगाची साडी (Yellow Saree Look) नेसली होती.
-
भूषणने या फोटोशूटसाठी पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट (White T-Shirt) आणि तपकिरी रंगाची पॅण्ट जॅकेट (Brown Pant Jacket) परिधान केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : भूषण प्रधान व गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर