-
छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून रेश्मा शिंदेला घराघरांत ओळखलं जातं. तिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
-
वैयक्तिक आयुष्यात रेश्मा शिंदेचा विवाहसोहळा गेल्यावर्षी २९ नोव्हेंबरला पार पडला. अभिनेत्रीच्या नवऱ्याचं नाव पवन असून तो साऊथ इंडियन आहे.
-
अभिनेत्री सध्या तिच्या सासरच्या कुटुंबीयांसह उडुपीला गेली आहे.
-
रेश्मा शिंदे उडुपी येथे देवदर्शनासाठी गेली आहे. या ट्रिपचे सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
उडुपी येथील ‘श्री कृष्ण मठ’ तसेच ‘गीता माता’ मंदिरात जाऊन रेश्मा व तिच्या सासरच्या कुटुंबीयांनी देवदर्शन केलं.
-
अभिनेत्री व तिच्या पतीने यावेळी साऊथ इंडियन लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. रेश्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या पतीसह सासऱ्यांची झलक पाहायला मिळत आहे.
-
रेश्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या गळ्यातील मंगळसूत्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
रेश्माचं हे मंगळसूत्र ‘पालमोनास’ (Palmonas) या तिच्या ज्वेलरी ब्रँडचं आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच या ज्वेलरी ब्रँडबरोबर भागीदारी करत पुण्यात कोथरुड येते स्वत:चं ज्वेलरी शॉप उघडलं आहे.
-
दरम्यान, रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत काम करत आहे. सध्या मालिकेच्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन ती कुटुंबीयांसह वेळ घालवत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम )

‘आई गं, काय डान्स केला राव…’, भर कार्यक्रमात काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक