-
मणिरत्नम आणि कमल हासन यांच्या बहुप्रतिक्षित ‘ठग लाईफ’ या चित्रपटाचा ट्रेलर चेन्नई येथे एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. (Photo: Raaj Kamal Films International/Instagram)
-
ठग लाइफचे स्टार सिलांबरसन टीआर, कमल हासन, त्रिशा, नासेर, ऐश्वर्या लक्ष्मी, अभिरामी आणि महेश मांजरेकर यांच्यासह ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये दिसले. (Photo: Raaj Kamal Films International/Instagram)
-
कार्यक्रमात त्रिशा खूपच सुंदर दिसत होती. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)
-
आधी एका कार्यक्रमात बोलताना त्रिशाने मणिरत्नम, कमल हासन आणि ए.आर. रहमान यांच्याबरोबर चित्रपटात काम करण्याचे स्वप्न ‘ठग लाईफ’मधून साकार होत असल्याबद्दल आभार मानले होते. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)
-
‘ठग लाईफ’च्या ट्रेलर लाँचवेळी अभिरामी भावुक झाली आणि कमल हासनला मिठी मारताना दिसली. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)
-
या चित्रपटातून जवळजवळ चार दशकांनंतर कमल हासन आणि मणिरत्नम हे एकमेकांबरोबर काम करत आहेत. त्यांचा शेवटचा १९८७ चा ‘नायकन’ हा चित्रपट होता. (Photo: Raaj Kamal Films International/Instagram)
-
या चित्रपटाचे लेखन कमल हासन आणि मणिरत्नम यांनी सह-लेखन केले आहे. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)
-
राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल, मद्रास टॉकीज आणि रेड जायंट मूव्हीज यांनी संयुक्तपणे निर्मित केलेला, ठग लाईफ हा कमल हासनचा मुख्य अभिनेता म्हणून २३४ वा सिनेमा आहे. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)
-
ठग लाईफ ५ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यास सज्ज आहे. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..