-
मणिरत्नम आणि कमल हासन यांच्या बहुप्रतिक्षित ‘ठग लाईफ’ या चित्रपटाचा ट्रेलर चेन्नई येथे एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. (Photo: Raaj Kamal Films International/Instagram)
-
ठग लाइफचे स्टार सिलांबरसन टीआर, कमल हासन, त्रिशा, नासेर, ऐश्वर्या लक्ष्मी, अभिरामी आणि महेश मांजरेकर यांच्यासह ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये दिसले. (Photo: Raaj Kamal Films International/Instagram)
-
कार्यक्रमात त्रिशा खूपच सुंदर दिसत होती. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)
-
आधी एका कार्यक्रमात बोलताना त्रिशाने मणिरत्नम, कमल हासन आणि ए.आर. रहमान यांच्याबरोबर चित्रपटात काम करण्याचे स्वप्न ‘ठग लाईफ’मधून साकार होत असल्याबद्दल आभार मानले होते. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)
-
‘ठग लाईफ’च्या ट्रेलर लाँचवेळी अभिरामी भावुक झाली आणि कमल हासनला मिठी मारताना दिसली. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)
-
या चित्रपटातून जवळजवळ चार दशकांनंतर कमल हासन आणि मणिरत्नम हे एकमेकांबरोबर काम करत आहेत. त्यांचा शेवटचा १९८७ चा ‘नायकन’ हा चित्रपट होता. (Photo: Raaj Kamal Films International/Instagram)
-
या चित्रपटाचे लेखन कमल हासन आणि मणिरत्नम यांनी सह-लेखन केले आहे. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)
-
राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल, मद्रास टॉकीज आणि रेड जायंट मूव्हीज यांनी संयुक्तपणे निर्मित केलेला, ठग लाईफ हा कमल हासनचा मुख्य अभिनेता म्हणून २३४ वा सिनेमा आहे. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)
-
ठग लाईफ ५ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यास सज्ज आहे. (Photo: KJ-The Shutter Bug/Instagram)
Thug Life: ट्रेलर लाँच सोहळ्यातील कमल हासन, त्रिशाच्या लूकने वेधले लक्ष, अभिनेत्री झाली भावुक
मणिरत्नम आणि कमल हासन यांच्या बहुप्रतिक्षित ‘ठग लाईफ’ या चित्रपटाचा ट्रेलर चेन्नई येथे एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित झाला.
Web Title: Thug life trailer launch kamal haasan trisha and silambarasan steal the spotlight abhirami gets emotional spl