-
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडने नुकताच तिच्या लेकाचा पहिला वाढदिवस साजरा केला.
-
कार्तिकीने तिच्या मुलाचं नाव रिशांक असं ठेवलं आहे.
-
रिशांकच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकी व तिच्या कुटुंबीयांनी खास तयारी केली होती.
-
रिशांकच्या पहिल्या वाढदिवसासाठी खास जंगल थीम पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
रिशांकच्या पहिल्या बर्थडे पार्टीसाठी तयार करण्यात आलेल्या सुंदर अशा ‘जंगल कार्टुन थीम’चं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
-
याशिवाय रिशांकच्या बर्थडे पार्टीचा मोठा केक सुद्धा याच थीमनुसार डिझाईन करण्यात आला होता.
-
गायिकेचे सगळे कुटुंबीय या बर्थडे पार्टीला उपस्थित होते. यावेळी कार्तिकी, तिचे पती रोनित पिसे आणि चिमुकल्या रिशांकने Twinning केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
“रिशांकच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन” असं कॅप्शन देत कार्तिकीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
दरम्यान, कार्तिकीच्या चाहत्यांनी या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत रिशांकला आशीर्वाद दिले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड इन्स्टाग्राम व santoshsalmalge.in )

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..