-
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनी आणि बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला.
-
या खास प्रसंगी स्टार प्रवाहच्या मालिकेतील लोकप्रिय कलाकार अर्थात ऋजुता देशमुख, रुपाली भोसले, अभिषेक रहाळकर, समृद्धी केळकर आणि कश्मिरा कुलकर्णी उपस्थित होते.
-
निसर्ग रक्षणाचा वसा हाती घेऊन या कलाकारांनी ब्रांद्रा परिसरात वृक्षारोपण केलं.
-
या प्रसंगी रुपाली भोसले म्हणाली, “निसर्गाचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे”.
-
“जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आम्हाला एका छान उपक्रमात सहभागी होता आलं याचा आनंद आहे”.
-
“लहान मुलांचे जसे आपण लाड करतो, संगोपन करतो अगदी तसंच झाडांचंही असतं”.
-
“झाडाला जितकं प्रेम, जितकी माया देऊ तितकं ते बहरत जातं”.
-
“आज जे रोपटं मी लावलं आहे त्याचं नाव मी तथास्तु ठेवलं आहे”.
-
“मी प्रेक्षकांना देखिल आवाहन करेन की प्रत्येकाने एक तरी झाड लावायला हवं. ही संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीचे आभार”.
-
अभिनेत्री ऋजुता देशमुख म्हणाल्या, “खूप भारावून टाकणारा अनुभव होता.
-
निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचं सुख शब्दात व्यक्त करता येणार नाही. निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलं आहे त्याला जपुया हेच याक्षणी सांगावसं वाटतंय.”
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ६६ व्या वाढदिवसानिमित्त नीना गुप्ता यांचा बिस्किट ब्रा व कफ्तान ड्रेसमध्ये बोल्ड लूक)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक