-
‘आई कुठे काय करते’ फेम निरंजन कुलकर्णीने नुकतीच विवाहगाठ बांधली.
-
गेल्या महिन्यात ९ तारखेला निरंजन मनीषा गुरमबरोबर विवाहबंधनात अडकला.
-
इन्स्टाग्रामवर ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा व्हिडीओ शेअर करत त्याने ही खुशखबर दिली.
-
या व्हिडीओमधून त्याने डेस्टिनेशन वेडिंग केल्याचंही सांगितलं होतं.
-
या व्हिडीओत निरंजन व पत्नीने वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो शेअर केले होते.
-
अशातच आता त्यांनी लग्नाचा पारंपरिक लूकमधील आणखी काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये निरंजन व त्याच्या पत्नीचा पेशवाई लूक पाहायला मिळत आहे.
-
अभिनेत्याने पांढरा सदरा व त्यावर गुलाबी रंगाचं धोतर परिधान केलं आहे.
-
तसंच त्याने डोक्यावर पुणेरी पगडी आणि कपाळावर चंद्रकोरही लावली आहे.
-
गोव्यातील मोरजीम बीचवर निरंजन व मनीषाचा लग्नाचा सोहळा पार पडला. (फोटो : इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल