-
उत्तराखंड येथील केदारनाथ धाम भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
-
यंदा २ मे रोजी केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. बर्फवृष्टीमुळे हे मंदिर दिवाळीनंतर सहा महिने बंद असतं. त्यामुळे मे महिन्यात मंदिर उघडल्यावर भाविक मोठ्या संख्येने केदारनाथ यात्रेला जातात.
-
बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी गेल्या महिन्याभरात केदारनाथला गेल्याचं पाहायला मिळालं.
-
आता नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता सुद्धा केदारनाथला पोहोचला आहे.
-
हा लोकप्रिय अभिनेता उत्तराखंडमध्ये सोलो ट्रिपसाठी गेला आहे.
-
उत्तराखंडच्या सोलो ट्रिपदरम्यान अभिनेता केदारनाथला सुद्धा गेला होता. “ॐ नमः शिवाय, बकेट लिस्टमध्ये असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी भेट दिली” असं कॅप्शन देत या अभिनेत्याने केदारनाथ मंदिर परिसरातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
उत्तराखंडमध्ये सोलो ट्रिप करणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून हास्यजत्रा फेम प्रथमेश शिवलकर आहे.
-
प्रथमेशने शेअर केलेल्या फोटोंमध्ये केदारनाथ मंदिर, उत्तराखंडमधील पर्वतरांगा, केदारनाथ ट्रेकदरम्यानचा निसर्गरम्य परिसर याची झलक पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, शिवाली परब, विदिषा म्हसकर यांसह नेटकऱ्यांनी प्रथमेशने शेअर केलेल्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश शिवलकर इन्स्टाग्राम )

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी