-
गर्भावस्थेदरम्यान काहीही समस्या येऊ शकतात म्हणून अनेक महिला घरी आपल्या कामातून ब्रेकही घेतात. पण दुसऱ्या बाजूला आता प्रेग्नेंसीदरम्यान महिलांनी घरातच बसून राहण्याचे दिवसही आता राहिले नाहीत. बदलत्या काळानुरूप जीवनशैलीमध्येही अनेक बदल होत आहेत. आता स्त्रिया प्रसूतीच्या तारखेपर्यंत काम करताना दिसून येतात याबाबत बी – टाऊनमधील अभिनेत्रींबाबत सांगायचे झाले तर काहीजणी शूटिंगमध्ये व्यस्त असतात तर काही रॅम्प वॉक करतानाही दिसतात. आज आपण बॉलिवूडमधील अशाच काही अभिनेंत्रीबाबत माहिती देणार आहोत, ज्यांनी प्रेग्नेंसीमध्येही त्यांचं काम केलं आहे. (Photo: Indian Express)
-
दीपिका पादुकोण
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणने गर्भवती असताना चित्रपटांचं चित्रिकरण केलं आहे. ‘सिंघम अगेन’ आणि ‘कलकी २८९८ एडी’ च्या चित्रीकरणादरम्यान ती गर्भवती होती. यातला कलकी साय-फाय अॅक्शन चित्रपट होता तो तिच्यासाठी आव्हानात्मक असूनही ती सर्व काळजी घेऊन तिच्या भूमिकेसाठी वचनबद्ध राहिली. (Photo: Indian Express) -
तर गरोदरपणात ‘सिंघम अगेन’ मध्ये काम करण्याबद्दल बोलताना दीपिकाचा नवरा रणवीर सिंग २०२४ मध्ये एका कार्यक्रमात म्हणाला होता की, “या चित्रपटात खूप स्टार आहेत. पण, मी तुम्हाला सांगतो या चित्रपटातून माझ्या बाळाचे म्हणजेच ‘बेबी सिम्बा’चे पदार्पण होत आहे” त्याच्या या टिप्पणीने सर्वांची मनं जिंकली होती. (Photo: Indian Express)
-
करीना कपूर खान
बॉलिवूडची बेबो करिना कपूर खानने तिच्या दोन्हीही गरोदरपणात तिचे काम सुरू ठेवले होते. तिच्या पहिल्या बाळाच्या जन्मादरम्यान, तिने ‘वीरे दी वेडिंग’चे चित्रीकरण पूर्ण केले. (Photo: Social Media) -
तिच्या दुसऱ्या गरोदरपणात, ती आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’च्या सेटवर परतली होती. याव्यतिरिक्त, तिने रॅम्पवॉकही केले. तसेच अनेक मासिकांवरही झळकली. या सर्व काळात तिने काम आणि आई होणे या दोन्ही भूमिका पूर्णपणे जगल्या.(Photo: Social Media)
-
आलिया भट्ट
गरोदरपणात शूटिंग करणारी आणखी एक बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. तिने करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे चित्रीकरण केले. याशिवाय ती राहाची आई झाल्यानंतर तिचा हॉलिवूडमधील पहिला चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ पूर्ण करण्यासाठी परदेशात गेली होती. आलियाने तंदुरुस्त राहून काम सुरू ठेवण्याच्या तिच्या सर्व तयारीत तिला मदत केल्याबद्दल तिच्या टीमचे वारंवार कौतुक केले आहे. (Photo: Indian Express) -
एका पत्रकार परिषदेत बोलताना ती म्हणाली होती की, जर तुम्ही फिट आहात, तर आराम करण्याची काही आवश्यकता नाही. मला नेहमी काम करणं आनंद देतं, कामचं माझी पॅशन आहे. (Photo: Indian Express)
-
यामी गौतम
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनेही आर्टिकल ३७० या चित्रपटाचं शूटिंग गर्भवती असताना केलं आहे. याबद्दल तिने चित्रपटाच्या ट्रेलर रिलिज सोहळ्यात स्वतःच माहिती दिली होती. (Photo: Indian Express) -
तिने हे गुपित मी कोणालाचं सांगितलं नव्हतं असंही सांगितलं होतं. या सर्व काळात तिने डॉक्टरच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले होते. (Photo: Indian Express)
-
कल्की कोचलिन
‘भ्रम’ या सायकोलॉजिकल थ्रिलरपटात काम करताना कल्कीला तिच्या पहिल्यांच प्रेंग्नंसीची माहिती मिळाली. या काळात तिला सकाळी उठल्यापासून अनेक भावनिक आव्हानांना तोंड द्यावे लागले पण तिने सर्व कलाकार आणि क्रूच्या पाठिंब्याने सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले. (Photo: Indian Express) -
दरम्यान, तिच्यासाठी हे करणे सोपे नव्हते असे अनेक मुलाखतींमधून नमूद केले आहे की तिच्या पहिल्या मुलाच्या जन्मादरम्यान मानसिक आरोग्याशी संघर्ष करणाऱ्या व्यक्तिरेखेची भूमिका साकारणे हे खूप आव्हानात्मक होते. (Photo: Indian Express)
-
नेहा धुपिया
दोन मुलांची आई असलेल्या नेहा धुपियानं ‘अ थर्सडे’ मध्ये दमदार अभिनय केला आहे. तिच्या या भूमिकेचं कौतुकही झालं आहे. (Photo: Indian Express) -
प्रेग्नंट असतानाही नेहाने स्वत:ला कामात व्यग्र ठेवले होते आणि चित्रपटाचे चित्रीकरण सुरुच ठेवले होते. या चित्रपटात नेहाने प्रेग्नंट महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. (Photo: Indian Express)
-
श्रीदेवी
लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मादरम्यान ‘जुदाई’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. दरम्यान, या चित्रपटानंतर त्यांनी अभिनयातून थोडा ब्रेक घेतला होता. (Photo: Indian Express) -
पण श्रीदेवी या ९० च्या दशकातील काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक होत्या ज्यांनी त्यांच्या प्रसूती रजेपर्यंत काम केले होते. (Photo: Indian Express)
-
हेमा मालिनी
बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल म्हणून ओळख असणाऱ्या हेमामालिनी सध्या बॉलिवूडपेक्षा राजकरणात सक्रीय आहेत. (Photo: Social Media) -
‘रझिया सुलतान’ चित्रपटादरम्यान त्या गरोदर होत्या. या चित्रपटात त्यांच्याबरोबर त्यांचे पती धर्मेंद्र देखील होते. (Photo: Social Media)
-
शर्मिला टागोर
बॉलिवूडच्या देखण्या अभिनेत्री शर्मिलाही त्यांच्या गरोदरपणात अभिनय करत होत्या. ‘आराधना’ चित्रपटादरम्यान सैफ अली खान आणि ‘छोटी बहू’ सिनेमादरम्यान सोहा अली खान त्यांच्या पोटात होती. असं असलं तरी त्यांनी पडद्यावर झळकणं कधीही थांबवलं नाही, त्यांच्या माध्यमातून चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी आदर्श उभा राहिला. (Photo: Indian Express) -
(Photo: Indian Express) हेही पाहा- Photos : झी सिने अवॉर्ड्समधला जॅकलिन फर्नांडिसचा ग्लॅमरस लूक; फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष…

Mumbra Train Accident : पाच जणांचा बळी घेणारं मृत्यूचं वळण! नेमका इथे घडला अपघात