-
कर्नाटक राज्यातील हंपी हे जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. १४ व्या शतकात हंपी हे शहर समृद्ध विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखलं जायचं.
-
दरवर्षी असंख्य पर्यटक हंपी येथे भेट देतात. याठिकाणी पर्यटकांना सुंदर वास्तुशिल्प आणि प्राचीन मंदिरं पाहायला मिळतात. तसेच विदेशी पर्यटकांमध्ये हंपी विशेष लोकप्रिय आहे.
-
बॉलीवूडसह अनेक दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांचं शूटिंग सुद्धा हंपी परिसरात करण्यात आलं आहे.
-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर नुकतीच हंपी फिरायला गेली होती.
-
हंपी येथील सुंदर फोटो वैष्णवीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
वैष्णवी कल्याणकर लोकप्रिय मराठी अभिनेता किरण गायकवाडची पत्नी आहे.
-
किरण सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
किरण व वैष्णवी यांचा लग्नसोहळा डिसेंबर २०२४ मध्ये कोकणात थाटामाटात पार पडला होता. त्यांच्या लग्नातील बरेच फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
दरम्यान, वैष्णवीबद्दल सांगायचं झालं, तर ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. यानंतर ती ‘तिकळी’ या मालिकेत झळकली होती. तर, किरण आणि वैष्णवीने एकत्र ‘देवमाणूस २’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. ( सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर इन्स्टाग्राम )

Russian Woman : घनदाट जंगलातील गुहेत आढळून आली रशियन महिला, दोन मुलींसह करत होती वास्तव्य; सांगितलं ‘हे’ कारण