-
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने आज बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण केली आहेत. तिने २००० साली ‘रिफ्यूजी’ या हिंदी चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
-
आज २५ वर्षांनंतर, करीना इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रीं बनली आहे. २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने अभिषेक बच्चनबरोबरचे चित्रपटातील अनसीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
करीना कपूरने तिच्या ‘रिफ्यूजी’ या पहिल्या चित्रपटाशी संबंधित काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहते खूप पसंत करत आहेत.
-
हे फोटो शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ’25 years and forever to go …” यासोबतच करीनाने लाल हृदयाचा इमोजी देखील जोडला आहे.
-
२५ वर्षांपूर्वीच्या फोटोतील करीना आणि अभिषेकचा लूक पाहून चाहत्यांनाही जुने दिवस आठवले. करिनाचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला होता. पण, तिच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली होती.
-
करीनाचा चित्रपट फ्लॉप झाला होता, पण त्यातील गाणी प्रचंड हिट ठरली होती. करिना आणि अभिषेकमधील केमिस्ट्रीही अद्भुत होती.
-
चाहत्यांनी करीनाच्य पोस्टवर २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
-
करीना शेवटची ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती.
-
तिचा आगामी चित्रपट ‘दारा’मध्येही झळकणार आहे. (सर्व फोटो साभार- करीना कपूर खान, इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : श्वेता तिवारीचं बोल्ड लूकमध्ये बीचवर फोटोशूट; लेक पलकबरोबरचं व्हेकेशन चर्चेत

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान