-
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी देखील गाजवताना दिसतेय. गेल्या काही महिन्यांमध्ये सई अनेक हिंदी प्रोजेक्ट्समध्ये झळकल्याचं पाहायला मिळालं आहे.
-
प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. २५ जूनला सईचा वाढदिवस असतो.
-
सईने तिचा यंदाचा वाढदिवस कसा साजरा केला याची झलक इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दाखवली आहे.
-
सई ताम्हणकर वाढदिवसानिमित्त सुंदर अशा धबधब्याच्या ठिकाणी भटकंती करण्यासाठी गेली होती.
-
नेटकऱ्यांनी सईचे फोटो पाहून हा धबधबा भंडारदरा येथील वसुंधरा Waterfall असल्याचं कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
-
सई वाढदिवसानिमित्त आपल्या मित्रमंडळींसह फिरायला गेली होती. याशिवाय दुसऱ्या एका फोटोमध्ये सईच्या आईने वाढदिवशी लाडक्या लेकीचं औक्षण केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
सईने आईबरोबरचा क्युट फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये मायलेकींनी एकमेकींना मिठी मारल्याचं पाहायला मिळत आहेत.
-
सईच्या बर्थडे पोस्टमध्ये सर्वाधिक लक्ष अभिनेत्रीच्या कॅप्शनने वेधून घेतलं. कारण, यामध्ये सईने “Birthday Dump!” असं लिहून खाली हॅशटॅगमध्ये स्वत:चं वय देखील सांगितलं आहे.
-
सईने कॅप्शनमध्ये नमूद केल्यानुसार ती आता ३९ वर्षांची ( २५ जून १९८६ ) झाली आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी सईवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर इन्स्टाग्राम )

Shambhuraj Desai : “गद्दार कुणाला म्हणतो रे?” ; अनिल परब विरुद्ध शंभूराज देसाईंचा सभागृहातला राडा काय? मंत्रिमहोदयांनी सगळंच सांगितलं