छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबिना दिलैकने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले असून, ती तपकिरी सॅटिन ड्रेसमध्ये क्लासी आणि एलिगंट लूकमध्ये दिसते आहे. न्यूड मेकअप आणि डायनॅमिक पोजसह तिच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने (Rubina Dilaik) तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतेच काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.ज्यात ती तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये ती अत्यंत क्लासी आणि एलिगंट दिसत आहे.या फोटोमध्ये रुबिनाने तपकिरी रंगाचा सॅटिनचा ड्रेस परिधान केला आहे, जो तिला खूपच शोभून दिसत आहे. तिने न्यूड मेकअप केला असून, तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसत आहे. विशेष म्हणजे तिने एका फोटोमध्ये तिच्या ड्रेसचा एक लांबचा भाग हवेत उडाल्याचे दिसत आहे, ज्यामुळे तिच्या फोटोंना एक डायनॅमिक लुक मिळाला आहे.या फोटोंना तिने ‘ M not your CAPPUCCINO’ अशी कॅप्शन दिली आहे.‘बिग बॉस १४’ची विजेती ठरल्यापासून ती अनेकदा म्युझिक व्हिडीओ आणि रिॲलिटी शोमध्ये दिसत असते. तिने ‘शक्ती – अस्तित्व के एहसास की’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती.(सर्व फोटो सौजन्य : रुबिना दिलैक / इंस्टाग्राम)