-
‘काँटा लगा’फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबीय, मित्रमंडळी आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. तिच्या अचानक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. (फोटो: पराग त्यागी/इंस्टाग्राम)
-
शेफालीचा पती अभिनेता पराग त्यागी याने त्यांच्या दोघांचे खास आणि याआधी कधीही न पाहिलेले फोटो एकत्र करून एक भावूक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (छायाचित्र: पराग त्यागी/इंस्टाग्राम)
-
या व्हिडीओसोबत परागने एक प्रेमळ चिठ्ठीही लिहिली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, “परी, तू पुन्हा जन्म घेईपर्यंत मी तुला शोधत राहीन आणि प्रत्येक जन्मात मी तुझ्यावर प्रेम करीत राहीन. मी तुला सदैव प्रेम करतो, मेरी गुंडी, मेरी चोकरी…” (छायाचित्र: पराग त्यागी/इन्स्टाग्राम)
-
काही दिवसांपूर्वीच छायाचित्रकार कुणाल वर्मा यांनी शेफालीच्या निधनाच्या काही दिवस आधी झालेल्या फोटोशूटमधील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (छायाचित्र: कुणाल वर्मा/इंस्टाग्राम)
-
फोटो शेअर करताना छायाचित्रकार कुणाल वर्मा म्हणाला, “ही पोस्ट मी नंतर शेअर करणार होतो. मी नेहमीच इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करण्यात मागेच राहिलो आणि वेळेत काहीच शेअर करू शकलो नाही.” (छायाचित्र: कुणाल वर्मा/इंस्टाग्राम)
-
तो पुढे म्हणाला, “ती मला नेहमी विचारायची की, तू हे फोटो शेअर का करत नाहीस? किती छान निघाले आहेत ते.” (छायाचित्र: कुणाल वर्मा/इंस्टाग्राम)
-
या पोस्टच्या शेवटी कुणाल म्हणतो, “आम्ही अजून बरेच फोटो घेतले होते, जे कधीच शेअर झाले नाहीत. लवकरच ते सर्व फोटो मी शेअर करणार आहे. जे फोटो तिला खूप आवडले होते आणि जिच्यासाठी ती खूप उत्साहित होती.”(छायाचित्र: कुणाल वर्मा/इंस्टाग्राम) -
२७ जूनच्या रात्री शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागी याने घरी बेशुद्धावस्थेत पाहिले. तातडीने रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (छायाचित्र: कुणाल वर्मा/इंस्टाग्राम)

“राज ठाकरे बडव्यांच्या कडेवर बसले”, सरनाईकांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र; म्हणाले, “मनसे अध्यक्ष थकून…”